जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कराड-पाटण फोटोग्राफर असोसिएशनचा ज्ञानवर्धक उपक्रम
उंडाळे - प्रतिनिधी.
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कराड-पाटण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने कराड येथे विविध उपक्रमांनी छायाचित्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन व कॅमेरा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी विजय बामणे (सांगली), ऋषिकेश शिरगावे, प्राजक्ता शिरगावे, कलबुर्गी लॅबचे अवधूत कलबुर्गी, असोसिएशनचे अध्यक्ष विजय शिंदे व उपाध्यक्ष माधव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी गतवर्षी दिवंगत झालेल्या फोटोग्राफी व्यवसायातील तसेच विविध क्षेत्रांतील व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.पहिल्या सत्रात विजय बामणे यांनी ‘फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफी व्यवसायासमोर निर्माण होणाऱ्या संधी, एआयचा प्रभावी वापर आणि भविष्यातील व्यवसायाच्या नव्या दिशा याबाबत त्यांनी माहिती दिली.दुसऱ्या सत्रात विद्यानगर, कराड येथील फोटो प्लस स्टुडिओचे संचालक ऋषिकेश शिरगावे व प्राजक्ता शिरगावे यांनी न्यूबॉर्न व किड्स फोटोग्राफीविषयावर कार्यशाळा घेतली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह त्यांनी छायाचित्रणातील विविध तंत्रे, प्रकाशयोजना आणि लहान मुलांच्या फोटोग्राफीतील बारकावे समजावून सांगितले. त्यामुळे कार्यशाळा उपस्थित छायाचित्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरली.यावेळी जे.पी. स्टुडिओ, कराडच्या वर्धापन दिनानिमित्त जीवन पाटील व त्यांच्या पत्नीचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विजय शिंदे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष माधव चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित छायाचित्रकारांनी असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी संयोजन समितीचे सुनील शिंदे, संतोष यादव, राकेश शिंदे, विराज बोराडे, अमोल कनोजिया, प्रसाद पाटील, महेश सुपनेकर, विनायक माने, जीवन पाटील यांच्यासह असोसिएशनचे बहुसंख्य सदस्य छायाचित्रकार उपस्थित होते. हॉटेल कृष्णा पॅलेस, कराड यांच्या अल्पोपहार व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Post a Comment
0 Comments