Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

ग्रंथालयाच्या ज्ञानवृक्षावरती वाढलेली वेल म्हणजे पुस्तके आणि त्यावरती बहरलेले फुल म्हणजे वाचक: प्राचार्य प्रो.डॉ. सतीश घाटगे

 ग्रंथालयाच्या ज्ञानवृक्षावरती वाढलेली वेल म्हणजे पुस्तके आणि त्यावरती बहरलेले फुल म्हणजे वाचक: प्राचार्य प्रो.डॉ. सतीश घाटगे.

कराड - प्रतिनिधी. 

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथालय दिन साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो..डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, ग्रंथालयाच्या ज्ञानवृक्षावरती वाढलेली वेल म्हणजे पुस्तके आणि त्यावरती बहरलेले फुल म्हणजे वाचक होय. डॉ. एस. आर. रंगनाथन हे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक होते. त्यांनी ग्रंथालय शास्त्रास पाच महत्त्वाचे नियम दिले. त्यामध्ये पुस्तके वाचण्यासाठी आहेत. वाचकाला त्याचे पुस्तक मिळाले पाहिजे. प्रत्येक पुस्तकाला वाचक मिळाला पाहिजे. वाचकाचा वेळ वाचावा. ग्रंथालय ही वाढणारी संस्था आहे. या नियमावरच ग्रंथालय शास्त्राचा कार्यभार चालतो. आज मोबाईल तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी वाचन कमी असल्याचे दिसते. अशा दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यात वाचन संस्कृती वाढवली पाहिजे त्यासाठी विद्यार्थी जास्तीत जास्त ग्रंथालयात आले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी ग्रंथालयासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही. आज ग्रंथालय दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो!

             या कार्यक्रमात ग्रंथ वाचन करण्यात आले यामध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य गुरुदेव कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तसेच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी हेही सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विश्वनाथ सुतार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती धर्माधिकारी यांनी केले. ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. सोनाली रांगोळे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी डॉ. मारुती सूर्यवंशी, डॉ. सुभाष कांबळे, प्रा. अण्णासाहेब पाटील, प्रा. सुरेश यादव, प्रा. जीवन अंबुडारे,  उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रा. जयदीप चव्हाण, प्रा. धनराज घुबडे, प्रा. संभाजी पाटील, शिक्षकेतर कर्मचारी सौ. उज्वला साठे, श्रीमती वैशाली सेन, श्री. पंकज कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments