एस.सी. आरक्षण उपवर्गीकरण हे आर. एस. एस, भाजपाचे षडयंत्र ___उत्तरेश्वर कांबळे.
सोलापूर - प्रतिनिधी.
अनुसूचित जाती [एस सी] आरक्षणातील अ.ब.क.ड उपवर्गीकरण हे आर.एस.एस व भाजपाचे षडयंत्र असुन मातंग समाजातील काही पुढारी त्याला बळी पडत आहेत अशी. प्रतिक्रिया भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.अधिक बोलताना कांबळे म्हणाले म्हणाले की या संतापजनक निर्णयामुळे समाजात कृत्रिम फूट निर्माण होण्याची शक्यता असून भेदभावाला चालना मिळेल आता जे मातंग समाजातील नेते कसबे ,चांदणे ,कांबळे आदी आर. एस.एस,भाजपाच्या कुटील डावाला बळी पडले असुन उपवर्गीकरण झाले पाहिजे म्हणून मोर्चे काढत आहेत आर.एस.एस व भाजप यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून एस सी उपवर्गीकरणाचे आरक्षण यावर दोन मोठ्या जातीत म्हणजे महार व मांग यांच्यात भांडण लावून राजकीय पोळी भाजून घेत आहे.
कांही मातंग नेत्यांना तर मंत्री पदाचे डोहाळे देखील लागले आहेत.याच कसबे ,चांदणे, कांबळे यांना महाराष्ट्रात महार [बौद्ध] समाजाने स्टेज उपलब्ध करून मोठे केले आज तेच लोकं आंबेडकरी विचारांशी गद्दारी करून आर.एस.एस व भाजपाचे ओझ वाहून नेण्यात धन्यता मानत आहेत.अशा समाजाची दलाली करणाऱ्या नेत्यांपासून मातंग समाजातील तरूण भरकटत चालला आहे असे देखील उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.


Post a Comment
0 Comments