Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कोडोली प्रशालेत विद्यार्थ्यांना 'जीवनरक्षक'धडे

 कोडोली प्रशालेत विद्यार्थ्यांना 'जीवनरक्षक'धडे   

 कार्वे - प्रतिनिधी.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पथकाने  कराड तालुक्यातील कोडोली येथील हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशालेत  एनडीआरएफ च्या जवानांनी विद्यार्थ्यांसमोर पूर बचावाची प्रात्यक्षिक सादर केली. पुराच्या पाण्यात अडकलेले व्यक्तींच्या सुरक्षित बचाव,दोरीच्या साह्याने रेस्क्यू, लाइफ जॅकेटचा योग्य वापर, सुरक्षित स्थळी स्थलांतर, वेगवान प्रवाहात घ्यावयाची काळजी तसेच आपत्तीकालीन परिस्थितीत घाबरून न जाता योग्य निर्णय कसा घ्यावा याबाबतचे धडे दिले.  एनडीआरएफ चे टीम कमांडर इन्स्पेक्टर दिलीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली जवान महेंद्र आसने, बालाजी रणदिवे, गजानन पाथरीकर, खंडू कांबळे आणि विनेश यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक बचाव कार्याची थरारक प्रात्यक्षिक दाखवले.जवानांनी आपत्तीच्या वेळी प्रत्यक्ष क्षण महत्वाचा असतो. त्यामुळे संयम, सतर्कता आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन हीच खरी सुरक्षा असलेले संदेश दिला.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील नाना प्रभारी मुख्याध्यापक संतोष आंबी सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तलाठी अमोल गावडे, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, पोलीस पाटील सुधाकर जगताप, सरपंच मीनाक्षीताई जगताप ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments