जावेदभाई नायकवडी यांचा विशेष पुरस्काराने गौरव; 'समता सामाजिक विकास संस्था'तर्फे सन्मान.
कराड - प्रतिनिधी.
सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणारे आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे जावेदभाई नायकवडी यांना 'समता सामाजिक विकास संस्था, कराड यांच्या वतीने विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कराड येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.जावेदभाई नायकवडी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न' पुरस्कार मिळावा आणि कराड शहरात त्यांचे भव्य स्मारक उभारले जावे, यासाठी २०१७ पासून सातत्यपूर्ण लढा उभारला आहे. या रास्त मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता,यामध्ये सलीम पटेल,आनंदराव लादे, नितिन आवळे, संतोष थोरवडे व महिला पदाधिकाऱ्यांचाही सहभाग होता.याशिवाय, 'जान फाउंडेशन'च्या माध्यमातून ते विविध सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आणि सामाजिक विकासाच्या उपक्रमांसाठी सदैव हिरीरीने पुढाकार घेत असतात. त्यांच्या या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेऊनच समता सामाजिक विकास संस्थेने त्यांना या विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे.जावेदभाई नायकवडी यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कराड शहर व परिसरातून, तसेच विविध सामाजिक व राजकीय स्तरामधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
"सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून सातत्याने लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा असा सन्मान होणे ही काळाची गरज आहे."___कवी नितीन चंदनशिवे


Post a Comment
0 Comments