Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

विलासराव पाटील उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त ओंड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

 विलासराव पाटील उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त ओंड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

उंडाळे - प्रतिनिधी.

माजी सहकार मंत्री कै. विलासराव पाटील उंडाळकर यांनी उभा केलेला समाजसेवेचा त्यांचा वारसा पुढे सुरू राहावा, या उद्देशाने ओंड येथील पंडित गोविंद पंत हायस्कूलमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या-पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपावी हा उद्देश होता.कै. विलासराव पाटील उंडाळकर यांनी सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात दिलेले योगदान आजही अनेकांसाठी प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि समाजाप्रती असलेली संवेदनशीलता जपली जावी, या भावनेतून पंडित गोविंद पंत हायस्कूल ओंड  या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या आणि पुस्तके शैक्षणिक साहित्य देण्यात आले .यावेळी अध्यक्ष शरदकुमार शिंदे, सचिव प्रकाश शिंदे, संचालक शिवदास रेळेकर, सुरेश थोरात, मुख्याध्यापक आर. डी. जाधव तसेच तारूखचे माजी उपसरपंच विक्रम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर. डी. जाधव यांनी केले, तर आभार एस. एम. थोरात यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विलास काकांचे कराड दक्षिणच्या विकासासाठीचे योगदान विसरता येणार नाही , त्यांच्या जयंती निमित्त त्यांची आठवण उजळत राहावी आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होईल , 

विजयसिंह थोरात 

संचालक, ओंड शिक्षण मंडळ, ओंड 


Post a Comment

0 Comments