Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कासेगाव ग्रामपंचायतीचा प्रेरणादायी उपक्रम

 कासेगाव ग्रामपंचायतीचा प्रेरणादायी उपक्रम: वृक्ष व डस्टबिन वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

कासेगाव - प्रतिनिधी.(सुनील शिंदे)

 स्वर्गीय जनार्दन (काका) पाटील यांच्या जयंतीनिमित्त कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने एक प्रेरणादायी व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये भव्य वृक्ष वाटप व डस्टबिन वाटप कार्यक्रमासह ‘माझी वसुंधरा अभियान 4.0 व 5.0’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.हा कार्यक्रम दिनांक १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता ज्योतिर्लिंग मंदिर, चावडी चौक, कासेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामस्थांना वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले. तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येकाने जबाबदारीने वर्तन करावे, यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले. “एक झाड – पर्यावरणाचा श्वास, एक डस्टबिन – स्वच्छतेचा विश्वास” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.यावेळी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करून त्यांचे कौतुक करण्यात आले. या सन्मानामुळे इतरांनाही पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेसाठी प्रेरणा मिळणार असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.कासेगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments