Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

वाठार पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

 वाठार पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

 वाठार पोलीस ठाणे हद्दीतील शेतीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरणारे चोरटे अटक करुन तीन गुन्हे उघडकीस सहा शेतकऱ्यांच्या ८३०००/- रुपये किंमतीची सुमारे ९६० फुट तांब्यांच्या केबल जप्त वाठार पोलीस ठाणे हद्दीतील देऊर ता. कोरेगांव जि. सातारा गावच्या हद्दीतील मळवी नावच्या शिवारात अजित धनसिंग कदम यांच्या शेतातील विहीरीवरील सुमारे ७० फुट लांबीची तांब्याची केबल दिनांक ०२/०७/२०२६ रोजी दुपारी २:०० वा च्या दरम्यान चोरी करत असताना ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, पोलीस पाटील व वाठार पोलीसांच्या सतर्कतेने चोरी करणारे दोन चोरटे यांना रंगेहात पकडणेत आले होते. सदर चोरट्यांकडे वाठार पोलीसांनी कौश्यल्यपूर्ण अधिक व सखोल तपास केला त्यावेळी सदर चोरटयांनी देऊर तसेच तळीये परीसरातील सुमारे ६ शेतकऱ्यांच्या धरणालगतच्या तसेच विहीरीवरील पाणी उपसा पंपाला जोडणेत आलेल्या तांब्याच्या केबल चोरल्याची कबुली दिली. वाठार पोलीस ठाणे कडील एकुण ३ गुन्हे उघडकीस आले असुन शेतकऱ्यांच्या ८३ हजार रुपये किंमंतीच्या एकुण सुमारे ९६० फुट लांबीची तांब्याची केबल जप्त करणेत आली आहे.सदर कारवाई मा.निखील पिंगळे सो, पोलीस अधिक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, मा. राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगांव यांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत दिले सुचना प्रमाणे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले, पोलीस उपनिरीक्षक श्री. गहिनीनाथ सातव, पोलीस उपनिरीक्षक श्री. नितीन भोसले, सहा. फौजदार वाघमारे, काळे, पो.हवा. जितेंद्र शिंदे, अमोल कर्णे, सहदेव तुपे, अजय झुंजार, आनंदराव भोसले, सर्जेराव सुळ, धिरज यादव, विवेक शिंदे, पो.कॉ. विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रतिक देशमुख, आधिक शेलार, एकनाथ सरगर यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला असून  गुन्हयाचा तपास पो.हवा अमोल कर्णे, पो. हवा. सहदेव तुपे व पो.हवा. अजय झुंजार हे करीत आहेत. सदरच्या कामगिरीमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असुन वाठार पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेच्या गुन्हया संदर्भात संशयीत निदर्शनास आलेस अगर काही माहिती असल्यास गोपनियरित्या पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन राजश्री तेरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव तसेच सपोनि सुशिल भोसले वाठार पोलीस स्टेशन यांनी नागरिकांना केले आहे.

Post a Comment

0 Comments