य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनलची भव्य प्रचार सांगता सभा.
अभूतपूर्व आणि प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती.
कराड - प्रतिनिधी.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनलची भव्य प्रचार सांगता सभा अभूतपूर्व आणि प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने उत्साहात संपन्न झाली. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि ग्रामस्थांनी केलेली विक्रमी उपस्थिती हीच सहकार पॅनलच्या कार्यावर असलेल्या विश्वासाची पावती ठरली.या दरम्यान उपस्थितांना संबोधित करत असताना कारखान्याच्या सविस्तर आढावा मांडला. गेल्या ११ वर्षांत कारखान्याने केवळ आर्थिक प्रगतीच साधली नाही, तर शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवत विकासाचे नवे मानदंड निर्माण केले. कारखान्याची आर्थिक घडी मजबूत ठेवणे, ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेणे, आधुनिकतेची कास धरणे आणि सहकाराची मूल्ये जपत कारखान्याला राज्यात अग्रस्थानावर नेणे, ही सहकार पॅनलच्या नेतृत्वाची यशस्वी वाटचाल आहे. आज कृष्णा कारखाना ही केवळ एक संस्था नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या विश्वासाचा, स्वाभिमानाचा आणि विकासाचा भक्कम आधार बनला आहे. आजवर ज्या विश्वासाने आपण कारखान्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली, तोच विश्वास पुन्हा दाखवा तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. पुढील काळातही कारखाना अधिक सक्षम, प्रगत आणि शेतकरी हिताचा राहील यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करू असा ठाम विश्वास व्यक्त केला.कारखान्याच्या विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आणि कारखान्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी येत्या २१ जून रोजी कपबशी या चिन्हासमोर शिक्का मारून सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.


Post a Comment
0 Comments