जिल्हाधिकारी यांना पुरोगामी होलार संघटनेतर्फे अन्यायकारक कारवाईबाबत निवेदन सादर !
सातारा :- प्रतिनिधी.
होलार समाजाचे नेते नंदकुमार केंगार यांच्यावरील अन्यायकारक कारवाईची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.अशा आशयाचे निवेदन पुरोगामी होलार संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याबरोबर चर्चा करून सादर करण्यात आले.
नंदकुमार केंगार हे अकलुज ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील अंबेडकर चळवळीचे अग्रगण्य पदाधिकारी आहेत. तसेच ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठवले गट) या राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत. तसेच ते अखिल भारतीय होलार समाज संघटने महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांच्या घरावर राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाच्या अधिकाऱ्यानी सुनबाई घरामध्ये एकट्या असताना छापा टाकला. त्यांच्या सुनबाईंना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. वास्तविक सदर राज्य उत्पादन शाखेच्या कर्मचाऱ्याकडे सदर कारवाईचे लिखित स्वरुपातील आदेश अथवा वॉरंट नसताना छापा टाकण्याची कारवाई केलेली आहे. तसेच सदर कारवाई दरम्यान राज्य उत्पादन विभागाच्या कर्मचाऱ्याना कोणतीही अवैध साहित्य सापडले नाही. सदरचे कृत्य हे केंगार यांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव असून याचा नाहक त्रास त्यांच्या सुनबाई यांना झाला आहे. सदर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे त्यांची सामाजिक प्रतिमा व प्रतिष्ठा मलिन झाली आहे.त्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
सदर प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची वस्तुस्थिती काय आहे? याची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन आहे.पुरोगामी होलार संघटना, महाराष्ट्र राज्य ही सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि समाजाच्या स्वाभिमानासाठी कार्यरत संघटना आहे. कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होत असल्यास त्यास न्याय मिळवून देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. तेव्हा सदरच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत व संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी.अन्यथा,प्रकरणात न्याय मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.असाही गर्भित इशारा देण्यात आला आहे.यावेळी पुरोगामी होलार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश माने,सातारा जिल्हा संघटक मकरंद केंगार,भरत मदने,जिल्हा वंचितचे महासचिव दादासाहेब केंगार,नेते चंद्रकांत खंडाईत, धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष अशोक भोसले, साहित्यिक सुरेश तथा आबा मुळीक,ऍड.विलास वहागावकर,अनिल वीर आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments