हाॅटेल, ढाब्यावाल्यांकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
___ उत्तरेश्वर कांबळे
सोलापूर : प्रतिनिधी:
नेहमीच लोक पार्टी असो किंवा प्रवास हाॅटेल मध्ये जेवण, नाष्टा करण्यासाठी जात असतात परंतू तुम्ही त्या हाॅटेल, ढाब्याच्या किचन [ स्वयंपाक रूम] कधी आत मध्ये जाऊन पाहतात का?नसाल पाहत तर एकदा आवर्जून पहा तुम्ही पुन्हा कधीच हाॅटेल मध्ये जेवण करायला जाणार नाहीत आपण प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून वाचले असेल अमुक तमुक हाॅटेल मध्ये बिर्याणीत अळ्या आढळल्या ,समोश्यात अळ्या किडे आढळले वगैरे मायानगरी मुंबईत तर पाणीपुरी असो की वडापाव गटारातील घाणं पाणी टाकून बनविले जात होते पंढरपूर मध्ये तर बोकडाचे मटण म्हणून चक्क गाढवाचे मटण दिले जात होते.हाॅटेल व ढाब्यावाले नासलेल्या सडलेल्या खराब भाज्या फ्रिज मध्ये ठेवून गरम करून ग्राहकांना देत असतात मसाल्यात तळल्याने त्याची चव कळून येत नाही अस्वच्छ पदार्थ खावून लोकं आजाराला व मृत्यूला आमंत्रण देत आहेत हाॅटेल व ढाब्यांचे किचन ऐवढे अस्वच्छ आहेत की त्याची कधीच साफसफाई केली जात नाही अनेक हाॅटेल, ढाब्यांच्या किचनमध्ये उंदीर, घुशी राहतात हाॅटेल व ढाब्यावर काम करणारे आचारी, वेटर यांची हातापायांची नखे ,केस वाढलेली असतात स्वच्छतागृहात वापरली जाणारी चप्पल तो किचन मध्ये ही वापरतो या कामगारांना कधी हाॅस्पीटल मध्ये नेऊन तपासणी केली जात नाहीय अनेक फिरस्ती हाॅटेल व ढाब्यावर काम करतात बनविले जाणारे पदार्थ हे चांगल्या दर्जाच्या तेलात बनविले जात नाहीत अन्न व औषध प्रशासनाने प्रत्येक हाॅटेल, ढाबा ,चायनीज सेंटर, वडापाव भजी स्टाॅल कमीत कमी महिन्यातून एकदा तरी तपासणी केली पाहिजे परंतू तपासणी केली जात नसल्याने सर्व हाॅटेल व ढाब्यावाल्यांच फावतयं अन्न व औषध प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा भयंकर प्रकार आहे आपल्या करमाळा शहरात व तालुक्यात कंदर -जातेगाव कोंढारचिंचोली -आवाटी या सिमेमार्गावरील गावात विनापरवाना अनेक हाॅटेल व ढाबे असुन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जातीनिशी लक्ष देवून आरोग्यांशी खेळणाऱ्या अशा लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसार माध्यमातून केली आहे.


Post a Comment
0 Comments