Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

रयतेच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक विकासाचे पुरस्कर्ते, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज______ डॉ. सुभाष कांबळे

 रयतेच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक विकासाचे पुरस्कर्ते, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज______ डॉ. सुभाष कांबळे

कराड - प्रतिनिधी.

  श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे, इतिहास विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती शाहू महाराजांचे कार्य या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख साधन व्यक्ती डॉ सुभाष कांबळे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, रयतेच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,औद्योगिक, विकासाचे पुरस्कर्ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय. पुरोगामी महाराष्ट्राचा पाया खऱ्या अर्थाने शाहू महाराजांनी घातला. आपल्या कार्यकाळात त्यांनी समाजाला विषमतेतून बाहेर काढून समतेच्या मार्गावर आणले. संस्थानातील रयतेला शिक्षण मिळावे म्हणून सर्व जाती धर्मासाठी बोर्डिंग सुरू केल्या. मल्लविद्या, संगीत विद्या, अशा विविध कलांना प्रोत्साहन दिले. उद्योग व व्यापार यांना चालना दिली. शेतकऱ्यासाठी कुळ कायद्याची योजना राबवून शेतीसाठी जलसिंचन योजना सुरू केल्या. राधानगरी सारखे धरण व वीस पेक्षा अधिक बंधारे त्यांनी बांधले. प्रत्येक तालुक्यासाठी एक दवाखाना व फिरते दवाखाने सुरू केले. भारतात पहिल्यांदा बहुजनासाठी 50 टक्के आरक्षण महाराजांनीच दिले. सर्वधर्मसमभावाची संकल्पना राबवत असताना सनातनी व रुढीपरंपरावादी घटकांच्या विरोधात संघर्ष करावा लागला. अशा या महान राजाला जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, हजारो वर्षे अन्याय अंधकार अनिष्ट रूढी परंपरेच्या पगड्याखाली असलेल्या जनतेला शाहू महाराजांनी समतेचा मार्ग दाखवून प्रगतीपथावर आणण्याचे महान कार्य केले. महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये रयतेला न्याय दिला त्यामुळेच ते रयतेचे लोक राजे झाले.

                  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश यादव यांनी केले. आभार इतिहास विभाग प्रमुख प्रा. सचिन बोलाईकर यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मी जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. सुरेश रजपूत, प्रा. संभाजी, पाटील प्रा. विश्वनाथ सुतार उपस्थित होते. वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments