Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

मंत्री शंभूराज देसाई यांच्या अभ्यागत भेटी कार्यक्रमात नागरिकांशी संवाद.

मंत्री शंभूराज देसाई यांच्या अभ्यागत भेटी कार्यक्रमात नागरिकांशी संवाद.

पाटण :-प्रतिनिधी.

 दौलतनगर ता. पाटण येथे आयोजित अभ्यागत भेटी कार्यक्रमात नागरिकांशी मंत्री शंभूराज देसाई यांनी  प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज समस्या, महसूल विषयक प्रश्न, शासकीय योजनांचा लाभ तसेच पेन्शन प्रकरणांसंदर्भात नागरिकांनी निवेदने सादर केली. जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ आणि सकारात्मक कार्यवाही व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येतील.लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. जनतेचा विश्वास आणि सहकार्य हीच काम करण्याची प्रेरणा आहे.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजकार्य आणि संघटन बळकटीसाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे.

Post a Comment

0 Comments