सातारा जिल्हा अध्यक्षपदी नामदेव जगदाळे यांची फेरनिवड.
राज्यस्तरीय निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळावर.
उंडाळे - प्रतिनिधी.
राज्यस्तरीय निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी नामदेव जगदाळे यांची फेरनिवड झाली. राज्यस्तरावर कार्यरत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या सातारा अध्यक्षपदी राज्यस्तरावरील कोअर कमिटीने फेरनिवड निवड केली आहे .श्री. जगदाळे सातारा येथील रहिवासी आहेत. यांनी राबवलेल्या विविध स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, पाणी पुरवठा, आदी पर्यावरण पूरक उपक्रमाची दखल घेऊन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा राज्य कार्यकारणी मध्ये निवड केली आहे .५ जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पद्मभूषण आण्णासाहेब हजारे, राज्यध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या शुभहस्ते राळेगणसिद्धी येथे नियुक्तीपत्र देऊन प्रत्यक्ष कार्याला चालना दिली . या निवडीबद्दल पर्यावरण प्रेमी व विविध स्तरांवरून अभिनंदन होत आहे.


Post a Comment
0 Comments