राज्य संघटकपदी जगन्नाथ माळी यांची बिनविरोध निवड.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळावर
उंडाळे - प्रतिनिधी.
कराड तालुक्यातून राज्यस्तरीय निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कार्यकारणीवर राज्य संघटक म्हणून जगन्नाथ माळी यांची बिनविरोध निवड झाली. उंडाळे येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक जगन्नाथ माळी यांची राज्यस्तरावर कार्यरत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कार्य कारणीमध्ये "राज्य संघटक" पदावर राज्यस्तरावरील कोअर कमिटीने बिनविरोध निवड केली आहे .यापूर्वी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळामार्फत राबवलेल्या उपक्रमात सह ,एस. आर दळवी फाउंडेशन, सामाजिक वनीकरण, राष्ट्रीय हरित सेना , स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयात राबवलेल्या विविध पर्यावरण पूरक उपक्रमाची दखल घेऊन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा राज्य कार्यकारणी मध्ये निवड केली आहे .
५ जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विशेष सरकारी वकील अँड सुरेश लगड, माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड,राज्यध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या शुभहस्ते राळेगणसिद्धी येथे नियुक्तीपत्र देऊन प्रत्यक्ष कार्याला चालना दिली . राज्यस्तरावरील निवडीबद्दल जगन्नाथ माळी यांचे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ,उपाध्यक्ष शंकरराव पाटील, सचिव बी आर यादव, प्राचार्य बी आर पाटील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments