Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कालकथित अनुसया लोखंडे यांचा तृतीय स्मृतिदिन संपन्न.

 कालकथित अनुसया लोखंडे यांचा तृतीय स्मृतिदिन संपन्न.

पाटण :- प्रतिनिधी.

विश्वशांती बुद्ध विहार ,पाळशी, ता.पाटण, जि.सातारा येथे कालकथित अनुसया बंडू लोखंडे समाजसेविका यांचा तृतीय स्मृतिदिन  संपन्न झाला .पाटण तालुक्याचे वंचित बहुजन आघाडी चे महासचिव आयु.संजय बंडू लोखंडे व आयु .आनंदा बंडू लोखंडे यांच्या मातोश्री कालकथित अनुसया बंडू लोखंडे. यांचा तृतीय स्मृतिदिन विश्वशांती बुध्दविहार पाळशी ता.पाटण जि.सातारा येथील बुद्ध विहारामध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी आयु.बाळासाहेब जगताप उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा ( पश्चिम) व आयु.साहेबराव आनंदा लोखंडे सर ,संघटक,वंचित बहुजन आघाडी सातारा ( पश्चिम) या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक वंदन, त्रीसरण, पंचशील इ. धार्मिक विधी करण्यात आले.विधीचे काम आयु.साहेबराव आनंदा लोखंडे.बौध्दाचार्य, केंद्रीय शिक्षक यांनी केले.तद्नंतर श्रध्दांजली व शोकसभेचा कार्यक्रम घेण्यात आला. शोकसभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  आयु.उत्तम घोलप हे होते. आयु.साहेबराव आनंदा लोखंडे यांनी लोखंडे परिवारांच्या व बौध्द मायनॉरिटी एज्युकेशन संस्था,सांगली, वंचित बहुजन आघाडी सातारा जि. (पश्चिम) व वंचित बहुजन आघाडी कराड तालुका (दक्षिण), भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य, मुंबई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व कुटुंबीच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सेवा संघ, ओंड, ता.कराड जि.सातारा यांच्या वतीने श्रध्दांजली वाहिली.कार्यक्रमाचे आभार आयु.संजय लोखंडे यांनी मानले . या कार्यक्रमास आयु.आनंदा बंडू लोखंडे.,मच्छिंद्र सोपान गायकवाड, आयु.अमोल आनंदा लोखंडे.,आयु.विशाल आनंदा लोखंडे. आयुष्यमानिनी शारदा मच्छिंद्र गायकवाड-पाटण,आयुष्यमानिनी शैला संजय लोखंडे,आयुस्यमानिनी आशा आनंदा लोखंडे.,अंजली आनंदा लोखंडे.व विश्वशांती बुध्दविहार समितीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,बौध्द विकास मंडळ,पाळशी चे पदाधिकारी  व सदस्य.तसेच पाळशी गावातील मान्यवर व बौध्द समाजातील सर्व उपासक,उपासिका  उपस्थित होत्या.





Post a Comment

0 Comments