स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे एस. एस.सी. परीक्षेत उज्वल यश.
उंडाळे केंद्रात प्रणाली पाटील प्रथम.
उंडाळे -प्रतिनिधी.
उंडाळे ता. येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 95.84 टक्के लागला असून उंडाळे केंद्रात प्रणाली पाटील( 96.80) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर स्वरांगी थोरात हिने (96. 40)गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यालयाने केंद्रात व परिसरात अव्वल दर्जा कायम राखला आहे. विद्यालयात 90 टक्केवर गुण मिळवलेल्या विद्यार्थीचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अँड आनंदराव पाटील,प्राचार्य बी आर पाटील, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक जे. एस. माळी, शंकर आंबवडे, भिमराव पाटील उपस्थित होते. विद्यालयात प्रणाली पाटील (96.80),स्वरांगी थोरात (96.40), अमृता कुंभार( 94.60), सफिया नायकवडी (92.80),गीत चव्हाण (92.20),अफ्रीन मुलाणी (91.60), श्रेया कामले (91),साक्षी पाटील (90.60) या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ संपन्न झाला.90टक्केच्यावर 8 विद्यार्थी, 75 टक्केच्यावर 60 विद्यार्थीनी बाजी मारली.


Post a Comment
0 Comments