इंगरुळ येथे बौद्ध महोत्सवाचे भव्य आयोजन.
बौद्ध पोर्णिमा या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन.
शिराळा - प्रतिनिधी.
इंगरुळ ता. शिराळा येथे इंगरुळ ग्राम विकास मंडळ व सिद्धार्थ नगर नालंदा बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी इंगरुळ येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात येत असून पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक ०१ मे २०२६ रोजी सकाळी ०८ वाजता पंचशील धम्म ध्वजारोहन करण्यात येईल व बुद्ध वंदना पंचशील त्रिशरण ग्रहण करण्यात येईल तसेच सकाळी समता सैनिक दल यांची मानवंदना परेड असेल त्याच बरोबर पाळणा गीते सादर केली जाणार आहे सायंकाळी ०७:३० वाजता मान्यवरांचे स्वगत व संत्कार प्रमुख वक्ते मा. डॉ साधना पाटील मॅडम यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
०२ मे शनिवार रोजी सकाळी ०९:३० वा निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा. बक्षिसे महेश कांबळे व ब्रमा कांबळे याच्या कङून असेल सायंकाळी ०७:०० वा महिलांच्या समर्थनार्थ होम मिनस्टर खेळ पैठणीचा योगेश भावजी कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व महीलानी आणि इंगरूळ उपासक आणि उपासि का यांनी उपस्थित राहण्याचे अहवान आयोजकांनी केलेलं आहे. कार्यक्रमाचं आयोजन सिध्दार्थ नगर नालंदा बुद्ध विहार मु. पो. इंगरुळ ता. ३२ शिराळा जि. सांगली येथे करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments