Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा.

  जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा.


कासेगाव :- प्रतिनिधी.(सुनिल शिंदे )
 प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव ता. वाळवा येथे जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. आरोग्य अधिकारी,जि.प.सांगली,मा.डाॅ.विजयकुमार वाघ  ,जिल्हा हिवताप अधिकारी मा.डाॅ.प्रविणकुमार पाटील  यांच्या मार्गदर्शन सुचनेवरुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. वैद्यकिय अधिकारी डाॅ.सोफिया शेख व  मा.सौ.संगिता संभाजीराव पाटील अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली,यांनी या जिल्हास्तरीय जागतिक हिवताप दिन कार्यक्रमाचे उद्घाटन केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.डाॅ.प्रविणकुमार पाटील वाळवा तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले. 

 यावेळी हिवताप आजाराचे उत्कृष्ट काम केलेबद्दल वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी  व आरोग्य सेवक यांना प्रमाणपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी  मा.संगिता पाटील अध्यक्ष जि. प. सांगली, मा.सुप्रिया देवराज पाटील सदस्य वाळवा पंचायत समिती,मा.डाॅ. मिलींद पोरे  अति.जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.सांगली,मा.कल्पना गावडे लोकनियुक्त सरपंच, मा.सुजित पाटील दादा उपसरपंच ग्रा. प. कासेगाव, मा.प्रदीप माने लोकनियुक्त सरपंच धोत्रेवाडी यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी डाॅ.मिलिंद पोरे ,मा.सुप्रिया पाटील सदस्य वाळवा पंचायत समिती ईश्वरपूर व मा.कल्पना गावडे लोकनियुक्त सरपंच कासेगाव व मा.संगिता पाटील यांनी हिवताप आजाराबाबत मार्गदर्शन व आजाराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार मा.डाॅ.वृषाली देवापुरे  प्र. वैद्यकिय अधिकारी कासेगाव यांनी मानले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तपासे  व श्री.जाधव यांनी केले. याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील  पदाधिकारी,कर्मचारी,गटप्रवर्तक, आशा, ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments