राष्ट्रीय स्तरावरील Infotech Inception 2026 मध्ये महिला महाविद्यालय कराडचे घवघवीत यश.
कराड -प्रतिनिधी.
अग्रणी महाविद्यालय बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण याठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील Infotech Inception 2026 यामध्ये महिला महाविद्यालयातील 8 विध्यार्थीनी व प्रा. किशोर गुजर हे सहभागी झाले होते. या विध्यार्थीनींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला पोस्टर सादरीकरण - शिवानी कांबळे व गौरी शिंदे, रिसर्च पेपर सादरीकरण - निकिता नरळे व वैष्णवी पाटील,सिनेमॅटीक रील सादरीकरण - समीक्षा थोरात, मृणाल सोनवणे, शिवानी कांबळे, वैष्णवी कदम व गौरी शिंदे यासोबत गायत्री कांबळे व प्रतीक्षा पवार यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदविला. रिसर्च पेपर सादरीकरणामध्ये निकिता नरळे व वैष्णवी पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकवला त्यांना रोख रु. 1000/-, ट्रॉफी व सन्मानपत्र मिळाले. रिसर्च पेपर सादरीकरणसाठी प्रमुख तज्ज्ञ परीक्षक, पोस्टर स्पर्धेचे उदघाटक तसेच valedictory function साठी प्रमुख तज्ज्ञ परीक्षक म्हणून महिला महाविद्यालय कराडचे वाणिज्य विभाग प्रमुख श्री. किशोर गुजर यांनी काम पाहिले. प्राचार्य डॉ. व्ही. ए. कळंत्रे, गुजर सर व इतर तज्ज्ञ परीक्षक यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.महाविद्यालयाच्या वतीने पारितोषिक प्राप्त विध्यार्थीनी व प्राध्यापक यांचा यनिमित्ताने गुण गौरव करणेत आला.याबद्दल शिक्षण मंडळ कराडचे सचिव, चेअरमन, सहसचिव व सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य यांनी प्राध्यापक व विध्यार्थीनींचे अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments