उंडाळे येथे ग्रामस्थांच्यावतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन.
उंडाळे - प्रतिनिधी.
उंडाळे येथील ज्येष्ठ मंडळी, ज्योतिर्लिंग गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ आणि नवयुवक गणेश मंडळ ही नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. पवित्र रमजान महिन्याचे आणि शुक्रवार (जुम्मा) चे औचित्य साधून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या इफ्तार पार्टीत शेकडो हिंदू-मुस्लिम बांधव सहकुटुंब सहभागी झाले होते. यामध्ये आंबवडे सर व शब्बीर मुल्ला सर यांनी मनोगत व्यक्त करत असताना भाईचारा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला गेला. रमजानच्या पवित्र महिन्यात सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढवणे हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ मंडळी आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्द इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. अशा उपक्रमामुळे ज्योतिर्लिंग गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, नवयुवक गणेश मंडळातील कार्यकर्ते केवळ धार्मिक उत्सव नाही तर सामाजिक एकता टिकवण्याचे कामही करत आहेत अशा उपक्रमामुळे गणेशोत्सव असो किंवा रमजान ईद केवळ धार्मिक सण न राहता सामाजिक ऐक्याचे व्यासपीठ बनत आहे. ज्येष्ठांच्या व गणेश मंडळातील कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून इफ्तार पार्टीचे नियोजन केल्याबद्दल जेष्ठ मंडळी शामराव पाटील, पंडित पाटील, जे डी नाना, चंद्रकांत पाटील, दिलीप पाटील, प्रमोद पाटील, गणेश पाटील, तानाजी माने शंकर आंबवडे सर विजय पाटील संजय पाटील आदीसह मंडळातील सर्व कार्यकर्ते यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रहिमान नायकवडी, रज्जाक नायकवडी, नजीर नायकवडी शब्बीर नायकवडी, हाजी अयुब नायकवडी सादिज नदाफ, मुबारक मुल्ला जहांगीर संदे, ताजुद्दीन नायकवडी, वजीर नायकवडी अस्लम मुल्ला सिकंदर नायकवडी मैनुद्दीन नायकवडी तसेच मंडळातील शेकडो हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.उंडाळे येथील गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी इफ्तार पार्टीची आयोजन करून सामाजिक सलोखा, बंधुभाव वाढवणे आणि एकतेचा संदेश दिल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आभार दिलीप पाटील यांनी मानले.






Post a Comment
0 Comments