लाखोंच्या जल विद्युत पंपांच्या केबल व जल विद्युत पंप चोरीला.
जलविद्युत पंपांची विद्युत केबल चोरीमुळे कराड दक्षिणेतील शेतकरी अडचणीत.
उंडाळे - प्रतिनिधी.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उंडाळे विभागातील घोगाव, उंडाळे, जिंती, आकाईचीवाडी धरणावरील विद्युत पंपाच्या केबल तसेच विद्युत पंप आणि ठिबकसाठी बसवण्यात आलेले फिल्टर या शेती साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. या चोरीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून चोरट्यांना तातडीने पकडून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या चोरीमुळे उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा करता येत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
उंडाळे विभागात गेल्या आठ ते दहा दिवसापासून शेतकऱ्यांची 800 ते 1000 मीटर विद्युत केबल, उंडाळे येथील श्रमिक मुक्ती दलाचे राज्य पदाधिकारी व उदय पाटील यांचा साडेसात एच.पी. चा विद्युत पंप व धरणावरील दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या सुमारे 1000 मीटर विद्युत वाहक केबल चोरीस गेलेल्या आहेत.


Post a Comment
0 Comments