महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेस अभ्यास भेट.
कराड - प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड अर्थशास्त्र विभाग यांच्या वतीने अभ्यास भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं. वित्तीय साक्षरता या विषया अंतर्गत जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड शाखा कराड या ठिकाणी भेटीचे आयोजन करण्यात आलं होतं. या भेटीदरम्यान सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात वित्तीय साक्षरता या विषयावर मा. श्री. विनायक फडके (मुख्य कार्यकारी अधिकारी), मा. श्री. गजानन थोरात. ( शाखा व्यवस्थापक ) श्रीमती प्रणिती मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान बी.ए.भाग 1 व बी.कॉम. भाग 2 च्या विद्यार्थिनी सहभागी होत्या. यावेळी प्रा. संजीवनी पट्टेबहादूर, डॉ. शंकर हजारे, प्रा. रुपाली पवार, प्रा. शोभा पाटील यांची उपस्थिती होती.





Post a Comment
0 Comments