वडगाव हवेली येथे दि.२७ पासून सुवर्ण महोत्सवी पारायण सोहळा.
विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
कार्वे - प्रतिनिधी.
वडगाव हवेली ता. कराड येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री. राम नवमी ते श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम साप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत असून यावर्षी या पारायणाचे 50 वे सुवर्ण उत्सवी वर्ष असल्याने यावर्षी विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी हा पारायण सोहळा शुक्रवार 27 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत होणार असून या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी सात ते बारा श्री ज्ञानेश्वरी वाचन दुपारी साडेतीन ते साडेचार हरिपाठ सायंकाळी साडेचार ते साडेसहा श्रीमद् भागवत कथा सायंकाळी वेळेत सात ते नऊ या वेळेत हरिकीर्तन व दररोज महाप्रसाद हनुमान मंदियाच्या प्रांगणात होणार आहे . यानिमित्त ह. भ. प. प्रमोद महाराज आळंदीकर, ह. भ. प. राहुल महाराज फडतरे दिघंची ह भ प रंगनाथ महाराज नाईकडे, ह भ प उल्हास महाराज , बाळासो महाराज वडगावकर युवक मित्र बंडातात्या महाराज कराडकर कान्होजी महाराज देहुकर आदींची किर्तन सेवा होणार असून 3 एप्रिल रोजी बाळासो महाराज देहूकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.या कीर्तन सेवा साठी वडगाव हवेली पारायण मंडळ व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ साथ देणार आहेत यावर्षी या पारायणाची 50 वे वर्ष असल्याने अनेक विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले आहे. तरी या पारायण काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वरी पारायण मंडळ वडगाव हवेली ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments