कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्म) घोगाव येथे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
श्री.संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्म) घोगाव येथे फार्मसी स्पोर्ट्स असोसिएशन (एस.के.एस. फार्मा स्पोर्ट्स) व इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन व ए. पी.टी.आय. यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात पार पडली.
स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातील सातारा कोल्हापूर सांगली पुणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागातून विविध महाविद्यालयातील ५७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सिंगल बॉईज कॅरममध्ये २३ व डबल बॉईज कॅरममध्ये ४० व मुलींमध्ये सिंगल गर्ल कॅरममध्ये १० तर डबल गर्ल कॅरममध्ये २२ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
या स्पर्धेमध्ये सिंगल गर्ल कॅरममध्ये रनर श्वेता मोहिते (आदर्श इन्स्टिट्यूट अँड फार्मसी डी. फार्म विटा), सिंगल गर्ल कॅरममध्ये विनर रोहिणी लुगडे (लेट दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट अँड कॉलेज मालवाडी मसूर), सिंगल बॉईज कॅरममध्ये रनर आदित्य बर्गे (जेनेसिस इन्स्टिट्यूट अँड फार्मसी कॉलेज राधानगरी), सिंगल बॉईज कॅरममध्ये विनर अथर्व पाटील (अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी पेटवडगाव), तसेच डबल गर्ल कॅरममध्ये रनर रोहिणी लुगडे व वैभवी काकडे (लेट दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट अँड कॉलेज मालवाडी मसूर), डबल गर्ल कॅरममध्ये विनर विजया देसाई व सानिका पाटील (जेनेसिस इन्स्टिट्यूट अँड फार्मसी कॉलेज राधानगरी), डबल बॉईज कॅरममध्ये रनर अवधूत शिंदे व आदर्श किरुलकर (जेनेसिस इन्स्टिट्यूट अँड फार्मसी कॉलेज राधानगरी), तसेच डबल बॉईज कॅरममध्ये विनर अभिनव पवार व आदित्य पाटील (श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव) हे विद्यार्थी विजयी ठरले. यावेळी प्रशिक्षक म्हणून वसीम शेख जैनुद्दीन शेख यांनी काम पाहिले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील, श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मनीषा हरळीकर, जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, राधानगरीच्या प्रा. ऋतुजा पाटील व शहीद सिताराम कॉलेज ऑफ फार्मसी, टिटवेच्या प्रा. अनिता अथने यांचा सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रीडा प्रमुख प्रा. जयश्री जगदाळे यांनी परिश्रम घेतले. व सूत्रसंचालन प्रा. मोनिका शिंदे यांनी केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.


Post a Comment
0 Comments