सागांव वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये'मराठी भाषा गौरव दिन' उत्साहात साजरा.
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..." या उक्तीप्रमाणे, वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला ज्येष्ठ कवी, नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत एस एच इंगवले सर यांनी केले यामध्ये मराठी भाषेचा १५०० वर्षांचा समृद्ध इतिहास आणि तिचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
श्री.एस. एच. इंगवले यांनी मुख्याध्यापक ए.सी सदावर्ते यांची कार्यक्रम अध्यक्षस्थानी निवड केली, त्यास विद्यालयातील सौ. यु.आर.पाटील यांनी अध्यक्षीय निवडीस अनुमोदन दिले करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष ए. सी. सदावर्ते यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ए.सी. सदावर्ते सर यांनी विद्यालयातील मराठी अध्यापकांना पुष्पगुच्छ देऊन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनीही या गौरव दिनानिमित्त उत्स्फूर्तपणे आपली मनोगते व्यक्त केली. काहींनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. विशेष म्हणजे इ.५ वी व ६ वी विद्यार्थ्यांनी मी मराठी कलाकुसर युक्त व आकर्षक बॅच तयार केले. व मराठी गौरव गीत सामूहिक गायन सादर केले.या कार्यक्रमात श्री. बी. एम. नलावडे यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषा गौरव दिन महत्व सांगितले.कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे मराठी भाषा समृद्धी कार्य योगदान माहिती दिली कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या काव्यसंग्रहाचे आणि 'नटसम्राट' या नाटकाचे मराठी साहित्यातील स्थान स्पष्ट केले . श्री. बी. एम. नलावडे यांनी शिक्षकी मनोगत व्यक्त करताना, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपली ओळख असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनीही या गौरव दिनानिमित्त उत्स्फूर्तपणे आपली मनोगते व्यक्त केली. मराठी भाषेच्या जतन व संवर्धन साठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करावे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी श्रवण, वाचन, लेखन करुन स्वविकास भाषा विकास करावा वाचन संस्कृती जोपासली पाहिजे.साहित्यिकांच्या साहित्याचा आस्वाद घ्यावा असे सांगितले मराठी भाषेला मिळालेल्या 'अभिजात' दर्जाबद्दल अभिमान व्यक्त करून दैनंदिन जीवनात मराठीचा शुद्ध वापर करण्याचे आवाहन करण्यात आले उपस्थितांचे आभार श्री व्ही डी पाटील प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Post a Comment
0 Comments