Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर साळशिरंबे येथे उत्साहात संपन्न.

 राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर  साळशिरंबे येथे उत्साहात संपन्न.

कराड - प्रतिनिधी.

श्री. व्यंकटेश्वर शिक्षण संस्था, पेठ संचलित नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पेठ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर  कराड तालुक्यातील साळशिरंबे या गावी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडले.

शिबिराचे उद्घाटन प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटन समारंभासाठी सकाळचे वरिष्ठ संपादक श्री. सचिन रंगराव देशमुख तसेच जीवनदीप फाउंडेशनचे अध्यक्ष मा. शकूर मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती लाभली. साळशिरंबे गावच्या सरपंच सौ. प्रमिला कुंभार तसेच उपसरपंच श्री. अभिजित चवरे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रसिद्ध वक्ते व कीर्तनकार प्रा. ऋषिकेश खारगे यांनी “जगू पण आनंदाने” हा प्रेरणादायी संदेश देत विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची दिशा दिली. त्यांच्या व्याख्यानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 शिबिराच्या दुसऱ्या दिवशी  (दि. १९ फेब्रुवारी २०२६)शिवजयंतीनिमित्त  सुप्रसिद्ध बाल वक्त्या शिवकन्या साईशाताई दिग्विजय पाटील यांचे प्रभावी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास मा. श्री संभाजी थोरात CEO दापोली अर्बन बँक तसेच , मा. श्री. दिग्विजय पाटील मॅनेजर SDCC बँक, तसेच  विविध मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकी जपली.

 तिसऱ्या दिवशी  (दि. २० फेब्रुवारी २०२६)सकाळी गावात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.

खास  महिलांच्या साठी “होम मिनिस्टर” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.  

शिबिरादरम्यान Mahavistaar AI App द्वारे गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. चौथ्या दिवशी (दि. २१ फेब्रुवारी २०२६)

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गावातील रस्ते स्वच्छ केले तसेच “झाडे लावा – झाडे जगवा”, “स्वच्छ गाव – सुंदर गाव” अशा घोषणा देत जनजागृती रॅली काढली. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयामधील कलासारथी ग्रुप ने अत्यंत प्रभावी पद्धतीने  पथनाट्य, एकांकिका, लोकनृत्य यांचे सादरीकरण केले.गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.या शिबिरासाठी संस्थेचे सचिव मा. राहुलदादा महाडिक यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करत सामाजिक कार्यातून व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचे आवाहन केले. कार्यकारी संचालक डॉ. महेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिबिराचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत गावडे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले. साळशिरंबे येथे पार पडलेले राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून ग्रामविकासासाठी मोलाचे योगदान देणारे ठरले.हे शिबीर निवासी स्वरूपाचे होते त्यामुळे मुलांच्या व मुलींच्या राहण्याची व्यवस्था ही अंत्यत महत्वाची गोष्ट होती ती गावकऱ्यांनी  निभावली यामध्ये 20  मुलांच्या निवासाची सॊय सुनिल थोरात यांनी स्वतःच्या नवीन बंगल्यामध्ये केली 37 मुलींच्या राहण्याची सोय मिलिंद पाटील यांनी देखील स्वखुशीने केली.हे शिबीर यशस्वीरित्या पार पाढण्यासाठी संदेश थोरात, अभिजित चवरे व राहुल देशमुख यांच्यासह त्यांच्या कुठूबियांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या रोजच्या जेवणाची व नाष्ट्याची व्यवस्था देखील साळशिरंबे ग्रामस्थांनी केले. साळशिरंबे गावातील महिलांनी शिबिरासाठी, मुलांच्या भोजनासाठी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments