Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

सतुबुवा भंडाऱ्यानिमित्त सोनवडे येथील मैदानात चटकदार कुस्त्या.

 सतुबुवा भंडाऱ्यानिमित्त सोनवडे येथील मैदानात चटकदार कुस्त्या.

शिराळा -प्रतिनिधी.

सतुबुवा भंडाऱ्यानिमित्त सोनवडे (ता. शिराळा)येथे कुस्ती मैदान संपन्न झाले. आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी कुमार पाटील विरुद्ध सतीश मुळे यांच्यात लढत झाली पण ही कुस्ती सोडवण्यात आली.दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत प्रदीप पाटील याने एकछाक डावावर सुरज आवताडे यास चितपट केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत रणजीत आगलावे याने पोकळ घिसा डावावर शुभम शेणवी यास आसमान दाखवले. यावेळी संपत पाटील, अशोक सावंत, महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते. रोहन सुतार, मेघराज माने, प्रसाद पाटील, अर्जुन पाटील, भागोजी डोईफोडे, धनंजय मलगुंडे, सुशांत पाटील, साहिल मोहिते यांनी चटकदार कुस्त्या केल्या.पंच म्हणून आनंदा केसरे, संपत पाटील, महेश पाटील, एकनाथ पाटील, पांडुरंग पाटील, भास्कर नायकवडी वासुदेव ढेरे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments