Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्म)येथे अँटी रॅगिंगबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

 कॉलेज ऑफ फार्मसी  (डी.फार्म) येथे अँटी रॅगिंगबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.


         घोगाव :- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय थोरात.

उंडाळे :- प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्म) घोगाव येथे अँटी रॅगिंग विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कराडचे पोलीस कॉन्स्टेबल संजय थोरात यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी कायदे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

पोलीस कॉन्स्टेबल संजय थोरात यांनी रॅगिंग म्हणजे काय, रॅगिंगचे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शैक्षणिक जीवनावर होणारे परिणाम तसेच रॅगिंग केल्यास होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती दिली. महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थ्यांनी परस्परांचा सन्मान राखून मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करावे असे आवाहन त्यांनी केले.

रॅगिंगचा कोणताही प्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता त्वरित महाविद्यालय प्रशासन, पालक किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी रॅगिंगला प्रोत्साहन न देता त्याविरोधात जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी कायदे, त्याचे दुष्परिणाम आणि सुरक्षित महाविद्यालयीन वातावरणाचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण झाली असल्याचे  सांगितले.



Post a Comment

0 Comments