Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

आंदोलन !

       आंदोलन !

संपादकीय.

 पेपर फुटीच्या विरोधात सुरू असणारे जंतरमंतरवरचं पोषण   अखेर सोनम वांगचूक व कॉकरोच जनता पार्टी यांनी मागे घेतलं. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. नड्डा यांच्या हातून ज्यूस पिऊन वांगचूक यांनी उपोषण सोडलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं. 
“गुन्हेगारांना पकडलं असून ते जेलमध्ये आहेत. गेल्या अडीच महिन्यात कठोर कारवाई केली आहे. पेपरफुटी विरोधात कायदा बनवणार” असं आश्वासन मोदी यांनी दिलं व ते पाळलं .

 नीट पेपर लीक प्रकरणावरुन  देशात मोठा गदारोळ झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता . दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. त्यात मोठ्या संख्येने तरुण वर्ग सहभागी झाले . त्या शिवाय देशाच्या विविध भागात  सी. जे. पी.च्या समर्थनार्थ आंदोलन सुरु झाली . जंतर-मंतरवरील आंदोलक आणि पोलिसांमध्ये अनेक हिंसक झडपा झाल्या.

उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचूक यांनी एक्सवर पोस्ट केली होती .
 “आत्ताच मी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह आणि लेह-लडाखच्या शीर्ष संस्थांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 26 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण सोडलं आहे. याआधी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी मला भेटून किंवा पत्र लिहून उपोषण सोडण्याचा आग्रह केला होता. हे पाऊल अनेक अटी, दीर्घ चर्चा आणि देशातील संभाव्य हिंसाचार लक्षात घेऊन उचललं आहे. मी लवकरच एका व्हिडिओ पोस्ट करुन त्यात या अटींबद्दल विस्ताराने सांगणार आहे. मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की, तुम्ही सतर्क रहा आणि कुठलाही हिंसाचार नाही झाला पाहिजे”
 खरंच जंतर-मंतरवरच्या आंदोलनाला तरुण आंदोलकांची अफाट गर्दी जमली आंदोलकात मोठा उत्साह दिसला . भारतभरातून आंदोलनास पाठिंबा हे सगळं चित्र भारताच्या भविष्यासाठी विकासासाठी सकारात्मक दिसून आलं आणि अशीच भारताच्या विकासासाठी सकारात्मकता, एकता, अखंडता, बंधुभाव हा यात पीढीत रुजतोय हे बघून भारतीयांचा वैचारिक स्थर आजच्या इंटरनेटच्या युगात देखील वाढताना दिसतोय. आज पर्यंत कधीही रस्त्यावर भारतीय संविधान त्यातील मूलभूत अधिकार भाषण,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार याविषयी मुक्तपणे कुणीच बोलत नव्हतं पण आजची ही पिढी या आंदोलनात या गोष्टींवर भर देऊन  देऊन शासकीय सेवकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत होते.
 याचाच अर्थ तरुण पिढीला प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी इंटरनेटची अधिकृत माहिती मिळवून त्याच्यावर आपल्या कल्पनाशक्तीने आणि  सत्याच्या निकषावर त्याला पडताळणी करण्याचा प्रयत्न करत आहेत हे यातून सिद्ध होत आहे. प्रत्येक आंदोलक हा समान बुद्धिमत्तेचा आणि समान वैचारिकतेचा कदाचित नसेल पण त्याच्या विचाराची दिशा ही शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणारी असल्यामुळे त्या ठिकाणी तरुणांची इतकी गर्दी जमली आणि या गर्दीतूनच आपण काय विचार करतोय इतर काय विचार करत आहेत माझ्या देशाच्या विकासासाठी शिक्षणाची कोणती पद्धत कोणती असावी दिशा असावी या शिक्षणाला भक्कम बनवण्याची जबाबदारी कुणाची ? भारताच्या नागरिकाला असणारे  संविधानाने दिलेले अधिकार कोणते या सगळ्या गोष्टींचा उहापोह  या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण देशभर झाला. संविधान आणि शिक्षण सामाजिक विकास, जबाबदार व्यक्ती कोण ? त्याला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य या आजपर्यंत  अनअकलनीय गोष्टी होत्या त्या गोष्टी देशासमोर आणल्या . इथून पुढे आंदोलन मागण्या या नागरिकांच्या मतावर वर होतील. आज ही तरुणाई शिक्षणाविषयी विचार करू लागली आज यांनी पेपर फुटी बद्दल आंदोलन केलं. उद्या "नवीन शैक्षणिक धोरण आणि बहुजनांचं शिक्षण" यावरही विचार होईल.
 कांही शैक्षणिक संकुल राबवत असलेले शैक्षणिक "मोडस ऑपरेंडी"  छुप्या  पद्धतीने चाललेले त्यांचं वर्तन, भारतामध्ये असलेल्या सगळ्यात मोठ्या समुदायाची म्हणजेच इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती  अल्पसंख्यांक समुदाय यांना उपलब्ध असणाऱ्या शिक्षण पद्धतीच्या सवलती त्यावर मारलेला शैक्षणिक संस्थापक यांनी मारलेला डल्ला यासाठी देखील आंदोलन होतील. या संस्थाचालकांच्या धोरणामुळे या समुदायांमध्ये म्हणजेच ओ.बी.सी  एस.सी. एस.टी.  अल्पसंख्यांक समुदायांमध्ये  असणारे शिक्षण वंचित याला जबाबदार कोण ? शिक्षण गळतीमुळे वैचारिक अधिष्ठान समाजाला निर्माण होत नाही आणि तो समाज प्रगतीपासून वंचित राहतो आणि मग त्याचा राजकारणावर प्रभाव पडत असतो तो प्रभाव म्हणजे त्यांना त्यांच्या विकासाच्या मूळ उपाय योजनेपासून थोडक्यात जुजबी  उपायोजना हातामध्ये देऊन त्यांना खुश केलं जातं आणि सत्ता स्थापन केली जाते
 अविरत विकासाची संकल्पना ही कुठंतरी शिक्षणाच्या धोरणांच्या चुकीच्या लागू करण्यामुळे   खंडित होते आणि त्याचे परिणाम या देशाच्या मालकाला म्हणजेच या देशातील सामान्य जनतेला  होत असलेले दिसून येतात.
 मालकाने नेमलेले कांही भ्रष्ट आचरणाचे  लोकसेवकच मालकाला कोंडीत पकडणे, लुबाडणे, चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करणे, हे त्यांच्या कर्तव्याच्या विरोधात वर्तन करतात.आर्थिक स्वार्थासाठी आपलं आचरण भ्रष्ट बनवतात म्हणजेच भ्रष्टाचार करतात. मग त्यात शेतकऱ्यांचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, महिलांचा, अल्पसंख्यांक समुदायांचा व  इतर सामाजिक प्रश्न याबाबतीत त्यांची भूमिका ही त्यांच्या स्वार्थाचीच असते आणि ही भूमिका ओळखता  येत नाही या भूमिकेला कोण पहातच नाही या पद्धतीचा समज आज पर्यंत या लोकसेवकांचा झालेला होता. अलीकडची तरुण पिढी ही मोबाईलच्या रील मध्ये अडकलेली तरुण पिढी आहे असं ज्यांना ज्यांना वाटत होतं त्यांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की जगभराचा माहितीचा स्त्रोत त्या मोबाईलच्या माध्यमातून तरुण पिढीच्या हातात आहे आणि ती तरुण पिढी सुद्धा माहिती गोळा करते आणि आपली बौद्धिक संपदा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि याची चुनुक  जंतर-मंतरच्या आंदोलनावरून दिसली, या अगोदर होणाऱ्या आंदोलनामध्ये पुरुष आंदोलकांची संख्या जास्त असायची जंतर मंतरवर महिलांची संख्या दिसून आली ती इतर कोणत्याही आंदोलनापेक्षा निश्चितच जास्त होती. 
 भारतात व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला त्यामुळे या आंदोलनाकडे बघण्याची प्रत्येकाची वेगळी दृष्टी  असू शकते त्याच्यावर असलेल्या संस्काराचा, विचारधारेचा  प्रभाव  असू शकतो कदाचित आंदोलन करणारे विद्यार्थी व आंदोलनाला समर्थन देणारे नागरीक  त्यांना देशद्रोही वाटत असावेत,ज्यांना असं वाटतं त्यांची परिस्थिती, राजकीय स्थैर्य त्यांचं आर्थिक स्थैर्य त्यांच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उभी राहणारी त्यांची एक वेगळी व्यवस्था एकंदरीत आयुष्यामध्ये लाभलेले स्थैर्य हे सगळं भारतीय लोकशाहीच्या तत्त्वानुसार भारतीय लोकांच्या मूळ मिळालं याचा विसर पडलेला असतो त्यामुळे त्यांची विचारधारा एखाद्या आंदोलनाकडे बघण्याची आंदोलकांना देशद्रोही म्हणण्याची तयार झाली असेल.  एकंदरीत या सामाजिक समस्यांनी अनेक जन बाधित होतात त्याकडे डोळे उघडून न बघणं आणि शिक्षण ही एक अशी व्यवस्था आहे की ती तुम्हाला दारिद्र्याकडून तुमच्या विकासाच्या मार्गाकडे नेते याचा त्यांना कदाचित समज नसावा आणि समज जरी असला तरी देखील स्वतःच्या कोणत्यातरी फायद्यासाठी ते नासमज असल्याचं किंवा त्यांना समज नसल्याचं भासवतात आणि आपलं वर्तन त्या पद्धतीने ठेवतात की जे वर्तन हे बहुसंख्य भारतीय नागरिकांच्या तोट्याचे ठरतं आणि समाजात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे आज घडणारी गोष्ट पुढच्या कांही वर्षावर फेकली जाते आणि हाच छूपा विचार लोकांच्याकडून वापरला जातो. ज्या लोकांना सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक विकास नको असतो.

Post a Comment

0 Comments