कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी. फार्म घोगाव महाविद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एनडीआरएफ पुणे येथील निरीक्षक दिलीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली केशव पाचुकते, बालाजी रणदिवे, गजानन पाथरीकर, विजय शिंदे, विनेश के. हे सर्व उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपत्ती ही दोन प्रकारची असून नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती असे आपत्तीचे दोन प्रमुख प्रकार असून त्यामुळे होणारे जीवित, वित्तीय आणि पर्यावरणीय नुकसान कमी करण्यासाठी आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्तीनंतर काय नियोजन करावे, कशी तयारी करावी तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे कोणकोणते प्रमुख टप्पे आहेत, आपत्तीचे किती प्रकार आहेत, आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्टे याविषयी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. तसेच बंद पडलेले हृदय चालू करायचे असेल तर किंवा पेशंटला हृदयाचा झटकाआला तर त्याला सीआरपी थेरपी कशी द्यावी याचे त्यांनी स्वतः प्रात्यक्षिक केले व विद्यार्थ्यांच्याकडूनही अशा प्रकारचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना आज मिळालेले ज्ञान केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता आपल्या कुटुंबीयांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवावे,आपत्ती व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे अशा मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होते असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. जयश्री जगदाळे यांनी मानले.


Post a Comment
0 Comments