Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

‘पाणी हेच जीवन आहे’ जनजागृती फेरीतून जलसंवर्धनाचा संदेश

 ‘पाणी हेच जीवन आहे’ जनजागृती फेरीतून जलसंवर्धनाचा संदेश

उंडाळे :- प्रतिनिधी.

कराड येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळेचे मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन, मलकापूर (कराड) यांनी ‘पाणी हेच जीवन आहे’ या संकल्पनेवर शालेय आंतरवासितेमधील उपक्रम घेण्याचे ठरविले आहे. तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत दि. २१ ऑगस्टपासून जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने हौसाई विद्यालय, मलकापूर येथे जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने फेरी उत्साहात पार पडली. 

 इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी तसेच बी.एड. महाविद्यालयातील विद्यार्थी-शिक्षक फेरीमध्ये सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांच्या माध्यमातून ‘पाणी हेच जीवन आहे’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.जाणीवजागृती फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. नंदकुमार धनवडे, हौसाई विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी सर, प्राचार्य सतिश सावळकर सर, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आंतरवासिता गटाचे मार्गदर्शक प्रा.श्री. बी. बी. सकटे तसेच प्रा. श्रीमती शिल्पा देशमुख यांनी विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments