स्वातंत्र्यदिनानिमित्त जीवनदीप फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप.
उंडाळे :- प्रतिनिधी.
साळशिरंबे, ता. कराड येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि. 15 ऑगस्ट 2026, शनिवार रोजी "जीवनदीप फाऊंडेशनच्या वतीने" जि.प. प्राथमिक शाळा साळशिरंबे मधील इ. 1 ली ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना वह्या, पेन व इतर शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मा श्री. संपत पांडुरंग शेंडगे, मा.श्री. विकास जगन्नाथ कुंभार, मा.श्री. विकास महादेव शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. शकूर मुल्ला, उपाध्यक्ष राहुल देशमुख, सचिव संदेश थोरात, खजिनदार महेश पाटील, अजिंक्य पाटील तथा सर्व सदस्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी तसेच पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments