Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

मंत्री मकरंद जाधव पाटील यांची दरडग्रस्त व दरडप्रवण गावांच्या पुनर्वसनाबाबत बैठक संपन्न.

 मंत्री मकरंद जाधव पाटील यांची दरडग्रस्त व दरडप्रवण गावांच्या पुनर्वसनाबाबत बैठक संपन्न. 

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दरडग्रस्त व दरडप्रवण गावांच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेतली. पाटण (ता. मावळ, जि. पुणे) परिसरात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर दरडग्रस्त तसेच दरडप्रवण गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पुनर्वसनाची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी आमदार सुनील शेळके व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

मावळ तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. अशा गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. पुनर्वसनासाठी आवश्यक जमीन, तांत्रिक अहवाल, सर्वेक्षण, प्रशासकीय मान्यता आणि निधीशी संबंधित प्रस्तावांची कार्यवाही विनाविलंब पूर्ण करावी. अतिवृष्टीच्या काळात दरडींचा संभाव्य धोका असलेल्या भागांवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवावे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवून सुरक्षित, कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध पुनर्वसनाला प्राधान्य द्यावे असे आदेश मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.

Post a Comment

0 Comments