दिव्यांग बांधवांना सक्षम, स्वावलंबी आणि सन्मानाने जगण्याची संधी देणे ही आपली सामूहिक जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-
दिव्यांग बांधवांना केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न ठेवता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिले.पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सुलभ करावी. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राहण्यासाठी आवश्यकतेनुसार लॉटरी पद्धतीचा वापर करावा, तसेच दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या दिव्यांग नागरिकांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानपूर्वक आणि संवेदनशीलतेने वागणूक द्यावी. एसटी स्थानक परिसरात दिव्यांगांना रोजगारासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबत राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीही सकारात्मक पाठपुरावा करणार आहे.दिव्यांग बांधवांचा सर्वांगीण विकास, सन्मान आणि स्वावलंबनासाठी शासन कटिबद्ध आहे असंही यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी अभिवचन दिलं .


Post a Comment
0 Comments