Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सवादे येथे भव्य रक्तदान शिबिर.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सवादे येथे भव्य रक्तदान शिबिर.

कराड : प्रतिनिधी.

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण पश्चिम मंडलाच्या वतीने तसेच कराड दक्षिणचे आश्वासक आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सवादे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते होणार आहे.हे रक्तदान शिबिर सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळेत हनुमान मंदिर, सवादे (ता. कराड) येथे आयोजित करण्यात आले असून, काले, विंग व येळगाव जिल्हा परिषद गटांतील सर्व तरुण-तरुणी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, बीएलए-२ तसेच सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वेच्छेने रक्तदान करून या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा कराड दक्षिण पश्चिम मंडलाचे अध्यक्ष श्री. प्रविण साळुंखे यांनी केले आहे.


"आपले एक युनिट रक्त एखाद्याला नवजीवन देऊ शकते. चला, रक्तदान करूया... जीवन वाचवूया!" या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे."



Post a Comment

0 Comments