Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

स्वा.दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न !

 स्वा.दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा  संपन्न !


उंडाळे - प्रतिनिधी.
येथील स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयात, एन.सी.सी. (NCC) विभागाच्या वतीने नुकतीच राष्ट्रीय आपत्ती मोचन दल (NDRF) यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली. 
मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताची काळजी कशी घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य कसे करावे याचे सखोल प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले.
​कार्यक्रमाची सुरुवात करताना एन.डी.आर.एफ. च्या पथकाने अतिवृष्टी, महापूर, त्सुनामी, भूकंप, आग व अपघात यांसारख्या विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची ओळख करून दिली. अशा आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची खबरदारी, शोध व सुटका पद्धती, तसेच प्रथमोपचार पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः, हृदयविकाराच्या रुग्णांना सीपीआर (CPR) तथा कृत्रिम श्वासोच्छवास कसा द्यावा, रक्तस्राव कसा थांबवावा आणि अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने मदत कशी करावी याचे सजीव प्रात्यक्षिक्सह (Demonstration) उपस्थितांना प्रशिक्षण देण्यात आले. ही प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वतः करून पाहिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रसंगी तातडीने पावले उचलण्याचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले.
​या कार्यशाळेत एन.डी.आर.एफ. च्या विशेष पथकाने मार्गदर्शन केले, ज्यामध्ये खालील अधिकारी व जवान सहभागी होते दिलीप कुमार (इन्स्पेक्टर - पथक प्रमुख, शरद पवार संतोष जाधव. बालाजी रणदिवे, गजानन पाथ्रीकर,खंडू कांबळे तसेच एन.डी.आर.एफ. चे इतर सर्व सन्माननीय जवान उपस्थित होते.या भव्य कार्यशाळेत शाळेतील तब्बल ५० एन.सी.सी. कॅडेट्स, तसेच इयत्ता ९ वी चे विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रमास प्राचार्य जे. एस. माळी, पर्यवेक्षिका सौ. जे. पी. पाटील, एन.सी.सी. ए.एन.ओ. (NCC ANO) डी. एस. पवार,रविंद्र भोये, एस. व्ही. अंबवडे , पंकज पाटील, . विवेक जाधव कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी व ग्रामस्थांनी एन.सी.सी. विभाग, ५० कॅडेट्स आणि एन.डी.आर.एफ. पथकाचे विशेष अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments