शिराळा विभागात बसवलेले वीज स्मार्ट मीटर हटवावेत अन्यथा गुन्हे दाखल करु _____ ॲड.रवी पाटील
शिराळा - प्रतिनिधी.
शिराळा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या घरात लेखी संमती आणि पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार सुरू आहे. याविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिराळा तालुका* च्या वतीने महावितरणच्या उपविभागीय अभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले.
अॅड. रवि पाटील अध्यक्ष, शिराळा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली श्री. विनोद कदम, श्री. तुकाराम चव्हाण, श्री. सुनील घोलप, श्री. धनाजी गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले.
या निवेदनात महावितरणच्या कंत्राटदारांनी ग्राहकांच्या परवानगीशिवाय आणि कोणतीही नोटीस न देता घरात घुसून जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवले आहेत. हे कृत्य भारतीय संविधानातील "गोपनीयतेच्या हक्का"चा आणि भारतीय दंड संहिता कलम 441 "House Trespass" चा भंग आहे. वीज कायदा 2003 नुसार मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकाला लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. यानुसार हे गुन्हेगारी वर्तन आहे या संदर्भात जर महावितरणाने 4 दिवसात संमतीशिवाय बसवलेले सर्व स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पूर्ववत बसवण्यात न आल्यास,
शिराळा आणि कोकरूड पोलीस स्टेशनमध्ये संबंधित अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 329(1), 329(2) व 324(2) नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.तसेच शिराळा तालुक्यात बैठका* घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे.
10 दिवसांनी बहुसंख्य ग्राहकांसह शिराळा आणि कोकरूड पोलीस स्टेशनवर धरणे आंदोलन करून FIR दाखल केल्या जातील, अशी घोषणा अॅड. रवि पाटील यांनी केली.
"ग्राहकांच्या हक्कावर गदा येऊ देणार नाही. लोकशाही मार्गाने लढा तीव्र करू" असे यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments