अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात गुणवंतांचा गौरव, नवागतांचे स्वागत आणि पाठ्यपुस्तक वितरण सोहळा उत्साहात !
सातारा :- प्रतिनिधी (अनिल वीर यांजकडून)
रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन आणि पाठ्यपुस्तकाचे वितरण विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार बी.एन.यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी एसएससी बोर्ड परीक्षेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला.यामध्ये स्मित कदम आणि सई यादव यांनी 97.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.द्वितीय क्रमांक समीक्षा यादव तर तृतीय क्रमांक सिमरन शेख हिने प्राप्त केला होता.त्या सर्वांचा सत्कार घेण्यात आला. तसेच जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय Future Agriculture Leaders of India -FALI 12th CONVENTION मध्ये बिझनेस प्लॅन आणि इनोव्हेशन मॉडेल कॉम्पिटीशन या मध्ये पाचवा क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार बी.एन.यांची संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी फेरनिवड झाल्याबद्दल विद्यालयातर्फे उपमुख्याध्यापक प्रशांत पाटील, पर्यवेक्षिका शशिकला घोरपडे व पर्यवेक्षक उपेंद्र घाडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कलाशिक्षक वालेकर यांच्या कुंचल्यातून तयार झालेल्या शाखा माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन सौ.प्रितम फिसरेकर आणि सौ.आशा सकुंडे यांनी केले.
फोटो : अध्ययनार्थीना पाठयपुस्तक वितरण करताना मान्यवर.(छाया-अनिल वीर)


Post a Comment
0 Comments