Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

समाज विकास विद्यालयात पालक सभेचे उत्साहात आयोजन.

 समाज विकास विद्यालयात  पालक सभेचे उत्साहात आयोजन.

शिराळा - प्रतिनिधी.

हायर एज्युकेशन सोसायटी, शिराळा संचलित समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सागाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या पालक सभेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. आर. पी. पाटील सर होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. पी. बी. मोहिरे सर यांनी उपस्थित पालकांचे स्वागत करून सभेच्या उद्देशाविषयी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिक्षक मनोगतात श्री. आर. ए. चव्हाण सर व सौ. एस. जे. जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित पालकांनीही आपल्या भावना व्यक्त करून विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.सभेतील प्रमुख आकर्षण ठरले ते संस्था प्रतिनिधी मा. श्री. ए. बी. चव्हाण सर यांचे मार्गदर्शन. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अबॅकस स्कॉलरशिप परीक्षा, एन.एम.एम.एस. (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान विकसित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या संगणक शिक्षण कार्यक्रमाविषयी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी विद्यालयात इयत्ता ५ वी ते ८ वीसाठी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या स्पर्धात्मक क्षमतांमध्ये निश्चितच वाढ होईल, असा विश्वास संस्था सदस्य,श्री. एस. एस.भोसले सर यांनी व्यक्त केला.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मा. श्री. आर. पी. पाटील सर यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यालय सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. व्ही. विभूते मॅडम यांनी केले, तर सौ.एस. ए. नलवले मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. विद्यालयाच्या प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments