Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

भा.ज.पा.सातारा जिल्हा विभागीय आढावा बैठक संपन्न.

भा.ज.पा.सातारा जिल्हा विभागीय आढावा बैठक संपन्न.

कराड -प्रतिनिधी.

भारतीय जनता पार्टी, सातारा जिल्हा विभागीय आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाज, पक्षविस्तार, जनसंपर्क अभियान तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला.भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विभाग समन्वयक आमदार श्री. निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष व विभाग संयोजक श्री. विक्रम पावसकर, विभाग सहसंयोजक श्री. विक्रम देशमुख, अभियान प्रदेश सहसंयोजक, आमदार श्री. विक्रम पाचपुते यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले,कराड उत्तरचे आमदार श्री. मनोजदादा घोरपडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विकसित भारताच्या संकल्पनेला आणि राज्यातील विकासाभिमुख नेतृत्वाला बळ देत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्षाची विचारधारा व विकासाची गती पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.संघटन हीच भारतीय जनता पार्टीची खरी ताकद असून कार्यकर्त्यांच्या समर्पण, निष्ठा आणि अथक परिश्रमाच्या बळावर पक्ष अधिक व्यापक स्वरूपात जनसेवेचे कार्य पुढे नेईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.



Post a Comment

0 Comments