कालकथित नितीन गोतपागर यांचा रक्षाविसर्जन व जलदान विधी संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
कालकथित नितीन गोतपागर यांचा रक्षाविसर्जन विधी संपन्न.मु.पो.तुळसण, ता.कराड जि.सातारा येथील माजी श्रामणेर नितीन बाजीराव गोतपागर यांचे वयाच्या 45 वर्षी अल्पशा आजाराने शनिवार दि.16/05/2026 रोजी सकाळी 09.30 वा.दु:खद निधन झाले.त्यांचा जलदान विधी ,रक्षाविसर्जन व पुण्यानुमोदन हा कार्यक्रम त्यांच्या तुळसण या राहत्या गावी बुद्ध विहारामध्ये दि.18/05/2026 रोजी घेण्यात आला.या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.आयु.उत्तम मगरे साहेब.भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य, माजी अध्यक्ष मुंबई प्रदेश, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व कुटुंबीयांच्या वतीने श्रध्दांजली वाहिली, तसेचआयु.बाळासाहेब जगताप उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा ( पश्चिम) ,यांनी श्रध्देय ॲड.बाळासाहेब आंबेडकर संस्थापक अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने,आयु.साहेबराव आनंदा लोखंडे सर ,संघटक,वंचित बहुजन आघाडी सातारा ( पश्चिम) , व भारतीय बौद्ध महासभा कराड तालुका संघटक, 32 गावे ढेबेवाडी विभागाचे अध्यक्ष आयु.सुरेश माने - माजी श्रामणेर, बौध्दाचार्य, आयु.सतिश गोतपागर धम्मसेवक, आयु.विजय गावडे साहेब, समाजसेवक, मान्यवरांनी व उपस्थित पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी कालकथित नितीन गोतपागर यांना भावपूर्ण श्रध्दांजली/आदरांजली वाहिली व श्रध्दांजली पर मनोगते व्यक्त केली. श्रध्दांजली पर मनोगतामध्ये मा. उत्तम मगरे साहेब यांनी पत्तीदान सुत्त व तथागत भगवान बुद्धांचा प्रतित्य समुत्पाद याची माहिती सांगितली.
अनिच्चा वत सडःखारा, उप्पादवय-धम्मिनो,
उपाज्जित्वा निरुज्झन्ति
तेसं वूपसमो सुखो
म्हणजे जग हे अनित्य आहे परिवर्तनीय आहे.
ज्यांचा जन्म झाला आहे तो केव्हा ना केव्हा तरी मरणारच आहे.मरण केव्हा कोणास येईल हे कोणासही सांगता येत नाही.आणि म्हणूनच आपण जीवन जगत असताना कुशल कर्म करीत जीवन व्यतीत करावे.संपत्तीचा गर्व करु नये.संपत्ती आज आहे उद्या असेलच हे कोणी सांगू शकत नाही मग ती संपत्ती कोणतीही असो.सर्वाशी चांगले रहावे. त्यामुळे मरणाला घाबरुन चालणार नाही. कारण जीवन हे क्षणभंगूर आहे.आपण किती दिवस जीवन जगलो त्यापेक्षा कशा पध्दतीने जीवन जगलो याला फार महत्व आहे.भगवान बुद्ध म्हणतात. ज्याला प्रतित्य समुत्पाद समजला त्याला बुद्ध धम्म समजला हे लक्षात ठेवावे.तुम्हाला चांगले व सुखी जीवन जगायचे असेल तर बुध्दाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा लागेल.बौध्द म्हणजे बुध्दिवान व्यक्ती किंवा असा व्यक्तींचा समाज होय.माणसा-माणसामध्ये युध्द नको.प्रत्येकाला बुध्दाच्याच अहिंसा याचीच आवश्यकता आहे.माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करावयाचा आहे. दुःख किती दिवस कवटाळून बसणार आहात.कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. ज्यांनी आपणास जन्माला घातले आहे त्यांना सुखाचे दिवस दाखवायचे आहेत.भूतलावर सर्वात हुशार प्राणी मानव आहे.मानव बुध्दीवान आहे. प्रज्ञाशील आहे.
म्हणून संसाराचा गाडा थांबवायचा नाही तर तो पुढे घेवून जायचा आहे सुख शांतीने समाधानाने चांगले जीवन, चांगले दिवस व सुख कसे देता येईल यांचा विचार नेहमीच मनामध्ये करावा.भारतीय बौद्ध महासभा ही माणसे घडवणारा कारखाना आहे.भगवान बुध्दाने आडीज हजार वर्षापुर्वी समस्त जनतेला पंचशील दिले आहे त्या पंचशीलेचे आचरण केलेने माणूस सुखी होतो.एकाही शीलाचे उल्लंघन करु नये ज्यांना चांगले जीवन जगावयाचे आहे. त्यांनी या पंचशीलेचा अवलंब करुन जीवनामध्ये आचरण करावे.कोणतेही व्यसन वाईट आहे मग ते कोणतेही असो त्यापासून अलिप्त राहणे हे प्रत्येक व्यक्तीचे कार्य आहे असे मनोगत व्यक्त केले.
शेवटी सामुदायिक श्रध्दांजली व सरणत्तय घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.उपस्थित सर्वजणांना भोजनदान देण्यात आले.या कार्यक्रमाच्या विधीचे काम (बौध्दाचार्य) म्हणून आयु. साहेबराव लोखंडे.सर यांनी केले.या कार्यक्रमास तुळसण गावातील बौध्द समाजातील बौध्द माता भगिनी , नितीन गोतपागर यांची, पत्नी रेश्मा,दोन मुले आदित्य,अमन,
भाऊ,बहिणी,भाचे,पुतणे,पुतणी,सासु,मेहुणे,साडू,मावशी,काका,काकी,इत्यादी सर्व नातेवाईक, पाहुणेमंडळी, सगे - सोयरे,उपासक-उपासिका,बाल-बालिका धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक औद्योगिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून दुःखामध्ये सहभाग घेतला व सर्वानी गोतपागर कुटुंबीयांचे सांत्वन केले व दुःख कमी करण्यास धीर व आधार दिला.त्याचे दुःख कमी करण्यासाठी त्याच्या दुःखामध्ये सहभागी झालेत.


Post a Comment
0 Comments