Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

सौ. मंदाकिनी जयवंत कणसे महिला उद्योजिकेचा महिला दिनानिमित्त सन्मान.

 मत्यापूर  येथे महिला दिनानिम्मित  भव्य  सन्मान सोहळा संपन्न.

सौ. मंदाकिनी जयवंत कणसे महिला उद्योजिकेचा   महिला दिनानिमित्त सन्मान.

कराड - प्रतिनिधी.

 कराड उत्तर मतदार संघातील नवनिर्वाचित महिला नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक यांचा महिला दिनानिमित्त भव्य सन्मान सोहळा मत्यापूर (ता. सातारा) येथे उत्साहात संपन्न झाला. समाजातील विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या महिला भगिनींचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या कार्यक्रमास हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी  सौ.मंदाकिनी जयवंत कणसे यांचाही यावेळी समाजभिमुख प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सौ. मंदाकिनी जयवंत कणसे या Anuja Food and Products (Maa's Pickle Pantry) नावाचा व्यवसाय उभा केला असून, त्याअंतर्गत सर्व उत्पादने सेंद्रिय गूळाचा वापर करून आणि preservative free तयार करतात. विशेषतः तेल विरहित लिंबू लोणचे, आवळा कँडी, शेंगदाणा ठेचा, मोरावळा, ओल्या हळदीचे लोणचे यांनी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.हा कार्यक्रम स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर व आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंच कराड उत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, त्याचबरोबर कार्यक्रमास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ.डॉ. प्रिया शिंदे, स्वाभिमानी सखी मंच अध्यक्षा सौ. समता घोरपडे, श्रीमती मंगलाताई घोरपडे, तेजस्विनी घोरपडे, रहिमतपूरच्या नगराध्यक्षा सौ. वैशाली निलेश माने आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments