अकौंटन्सी अभ्यासाचा उपयोग विध्यार्थ्यानी केवळ परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी करावा - प्रा. किशोर गुजर
उंडाळे - प्रतिनिधी.
आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, उंडाळे वाणिज्य विभागाच्यावतीने मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी आयोजित "Hospital Accounting & Use of Accounting Knowledge for Society" या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला महाविद्यालयातील वाणिज्य विभागप्रमुख श्री. किशोर गुजर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जाधव एम. टी. वाणिज्य विभाग यांनी केले.
प्रमुख पाहुणे श्री. गुजर यांनी बी-कॉम भाग 2 मधील विद्यार्थ्यांना सत्र 4 मध्ये VSC Hospital Accounting अंतर्गत *Project Report* करणे आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती सांगितली. अनेक समस्या असताना त्यावर मात करून प्रश्नावली, सदर अहवाल कसा तयार करावा, संशोधन अहवालाप्रमाणे त्याची Chapter scheme कशी असावी व Hospital Accounting बाबत Data Collection इ. बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच अकौंटन्सी अभ्यासाचा उपयोग विध्यार्थ्यानी केवळ परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी कसा करावा याबाबतही मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी अकौंटन्सी शिक्षणाची विध्यार्थी व समाज यांना असणारी आवश्यकता थोडक्यात स्पष्ट केली.सूत्रसंचालन प्रा. कापसे व्ही. वाय तर आभार प्रा. चव्हाण जे. एच. यांनी केले. यावेळी प्रा. एस. एम. जाधव, इतिहास विभागाचे श्री. अमोल सोनावले व सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments