Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव मध्ये सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा.

 वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव मध्ये सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा.

शिराळा -प्रतिनिधी.

वारणा विद्यालय व जुनिअर कॉलेज सागाव मध्ये क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने वार्षिक शाळा तपासणी संपन्न झाली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक  ए. आर. पाटील (साळुंखे)  मॅडम यांनी केले . यावेळी क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.पोपटराव मलगुंडे साहेब व विस्तार अधिकारी जगन्नाथ नाकील साहेब व विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. सदावर्ते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी विद्यालयातील प्रा.बी एम नलवडे सर यांनी क्रांतीज्योती ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत आजच्या पिढीने सावित्रीबाई फुलेंचा आदर्श बाळगून शैक्षणिक आणि सामाजिक नवी क्रांती करावी असे आवाहन केले. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने वार्षिक शाळा तपासणी शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सो पोपटराव मलगुंडे साहेब व विस्ताराधिकारी जगन्नाथ नाकील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक शाळा तपासणी पार पडली .वार्षिक शाळा तपासणी पथक सदस्य म्हणून शिव केदार विद्यालय कांदे सौ स्मिता पाटील मॅडम आणि अंबिका विद्यालय कणदूर चे मा.गोरे सर हे उपस्थित होते. यांनी शालेय भौतिक सुविधा परिसर त्याचप्रमाणे प्रयोगशाळा क्रीडांगण क्रीडा साहित्य आधीचे कसून तपासणी केली, शैक्षणिक गुणवत्ता व प्रगती त्याचप्रमाणे शालेय निकाल पत्रके विद्यार्थी उपस्थित प्रशासकीय कार्यालयीन कामकाज अभिलेखे रजिस्टर सेवा पुस्तके शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थी सुरक्षा समिती सखी सावित्र समिती आधी समितीचे अहवाल तपासणी करण्यात आली ग्रंथालय व विद्यार्थी रजिस्टर स्वच्छता पाणी वृक्षारोपण आधी कार्यालयीन कामकाजाबाबत मलगुंडे साहेबांनी समाधान व्यक्त केले त्याचप्रमाणे काही कृतींबाबत उपचारात्मक सूचना दिल्या व शालेय प्रगतीत सातत्याने भर द्यावा .शाळेची गुणवत्ता वाढवावी यासाठी सूचना दिली. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.वार्षिक शाळा तपासणी आभार प्रदर्शन श्री व्ही डी पाटील सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments