Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

भोंदूबाबा अशोक कुमार खरातांना पाठराखण करणाऱ्या सर्व दोषीवर तातडीने कारवाई करा.

 भोंदूबाबा अशोक कुमार खरातांना पाठराखण करणाऱ्या सर्व दोषीवर तातडीने कारवाई करा. 

_अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ 

कराड - प्रतिनिधी.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ "महिला मंच" व केंद्रीय समितीच्या वतीने  भोंदू बाबा अशोक खरात आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या रूपालीताई चाकणकर यांच्या सह सर्व दोषीवर  तातडीने कारवाई करावी .व वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकाराची जाहीर माफी मागावीअशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवीले आहे.

उच्च शिक्षित तसेच उच्चभ्रू रूपालीताई चाकणकर कायम समाजसेवेत अग्रेसर असतात, परंतु त्यांनी विज्ञान युगात एका भोंदूबाबाची पाठराखण करणे , बाबाचे पाय धुणे, अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे.दिनांक४ मार्च २०२५ ला दत्ता खेमनार पत्रकाराने वृत्तपत्रात भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आणण्यासाठी वृत्तपत्रात बातमी छापली असता रूपालीताई यांनी त्यांनाच धमकी दिल्याचे समोर आले आहे.  यामुळे पत्रकारावर झालेला अन्याय पत्रकार संघ सहन करणार नाही. या घटनेची कसून चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकाराने माफी मागावी असे सांगणाऱ्यांनी सुद्धा  पत्रकाराची जाहीर माफी मागितली पाहिजे. त्यांना महिला आयोग पदावरून  पद मुक्त करावे. भोंदू बाबा सोबतच इतरही दोषींवर कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महिला मंच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. कंचन मूरके यांच्यासह पत्रकार संघ राज्य कार्यकारणी प्रदेश उपाध्यक्षा प्रा.डॉ. मंजुषा सागर, महिला मंच सौ. सुरेखा दामेधर अध्यक्ष विदर्भ पश्चिम ,सौ.अक्षरा लहाने कार्याध्यक्ष विदर्भ महिला मंच तथा महिला मंच सदस्य यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना ई-मेलने पाठविले आहे.

Post a Comment

0 Comments