समाज विकास विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा.
शिराळा - प्रतिनिधी.
समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. पी. पाटील होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या सौ. वर्षांराणी प्रमोद दशवंत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कल्पना चावला यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ. साळुंखे मॅडम यांनी महिला दिनाचे महत्व सांगून केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. विभुते मॅडम यांनी करून दिला. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार विद्यालयाच्या सौ. बनसोडे मॅडम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील काही विद्यार्थिनींचा देखील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्मान केला.इ.पाचवी ची विद्यार्थिनी कु. श्रुती विजय दळवी हिने "मोगरा फुलला " हे गीत सुंदररित्या सादर केले. इ. नववीच्या विद्यार्थिनी वेदांती पाटील व समर्था तळेकर यांनी प्रमुख पाहुण्यांची त्यांच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासाविषयी मुलाखत घेतली. आजच्या प्रमुख पाहुण्या या शिराळा तालुक्यातील दूध संचलन करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या मुलाखती मध्ये शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. आर. पी. पाटील सर यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत अनेक कर्तृत्ववान महिलांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. पी. बी. मोहिरे ,उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री. जाधव , माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री कुलकर्णी सर,सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सौ.जाधव मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Post a Comment
0 Comments