Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे चालू शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदित्यमान यशाचे कौतुक करण्यासाठी व अभ्यासक्रमातील येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवून त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू  देऊन गौरवण्यात आले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या जिद्दीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फळ असून केवळ गुण मिळवणे म्हणजे शिक्षण नसून, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करणे हेच खरे यश असल्याचे सांगितले व पुढील येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी कशी तयारी करावी हे सांगून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे  यांनी केले, तर आभार प्रा . जयश्री जगदाळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments